रुकडी / ताः २१ रोहन देसाई
येथील ‘त्या’ कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या थेट संपर्कातील व एकाच कुटुंबातील सोमवार (दि.२०) रोजी दोन असे एकूण ३ तर संजय घोडावत विलगिकरण कक्षात ठेवलेल्या ३५ जणांपैकी मंगळवार (दि.२१) रोजी ९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी एकूण संख्या १२ वर पोहोचली आहे. यामध्ये ३ व ९ वर्षांच्या बालकांचा समावेश आहे. त्यामुळे रुकडीत एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान,’त्या’ महिलेच्या संपर्कातील एक खाजगी डॉक्टर व त्यांचा सहकारी यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.मात्र सदर पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील काही भाजी विक्रेते असल्याने ते नियमित बाजारात भाजी विक्रीसाठी मंडईत बसायचे तर एक महिला बांगडी विक्रेती आहे.त्यामुळे रुकडीत समुह संसर्गचा धोका वाढला असून रुकडीसह पंचक्रोशीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोग्य विभाग व कोरोना दक्षता समितीकडून सदर भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.