सोलापूर /त :21
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आयक्यूएसी विभागामार्फत सोमवार दि . 27 जुलै 2020 रोजी सकाळी अकरा वाजता ‘नॅक मूल्यांकन’ (रिवायझड ॲक्रिडेशन फ्रेमवर्क ऑफ नॅक) या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयक्यूएसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांनी दिली.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घ घाटन बंगळुरूच्या नॅकचे सल्लागार डॉ. गणेश हेगडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणार आहेत. नॅकचे उपसल्लागार डॉ. लीना गहाणे यांनी विद्यार्थी सर्व्हे, प्रत्यक्ष भेट व नॅक याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर नॅकचे सहायक सल्लागार डॉ. एन. आर. मोहन आणि डॉ. ए. व्ही. प्रसाद यांनीही नॅकच्या विविध गोष्टींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
नॅकच्या या ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचा विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्र .कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा आणि कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी केले आहे. या चर्चासत्रासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया चालू आहे. अधिक माहितीसाठी डॉ. एस. डी. राऊत (8605140815) आणि प्रा. सी. जी. गार्डी (7219111468) यांच्याशी संपर्क साधावा . असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.