प्रमोद गोसावी/ सोलापुर / ताः२१
सोलापुर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाय योजना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खास .श्री. शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली . सोलापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव पाहता बार्शी शहर व बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बार्शी शहर व तालुक्यात मुंबई-पुणेसह इतर शहरातून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे. अशा वेळोवेळी सूचना खास . ओमराजे निंबाळकर यांनी दिल्या होत्या .
तरीही तहसीलदार प्रदिप शेलार यांनी दुर्लक्षित केले. हाच मुद्दा काल खास .ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत उपस्थित केला. बार्शी शहर व तालुक्यात कोरोना विषाणूंच्या वाढत्या रूग्ण वाढीस सर्वस्वी तहसीलदार प्रदीप शेलार जबाबदार आहेत. त्यांच्यावर कार्यवाही करावी . अशी मागणी करण्यात आली होती.
त्याअनुषंगाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेवुन आज विभागीय आयुक्त, पुणे यांनी बार्शी तहसीलदार प्रदिप शेलार यांचा तडकाफडकी पदभार काढून घेऊन त्यांज्या जागी श्री. डी.एस.कुंभार यांच्या कडे पदभार देण्यात आला.