सोलापूर /ताः २३
सोलापूर शहरामध्ये सध्या कोविड संदर्भात उपाय योजना करणेत येत असून, त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडील डी.सी.ए. आणि सी.सी.ए.सी. या हॉस्पिटची बिल तपासणी करण्याकरिता मंत्री महोदय यांनी जे निर्देश दिलेले आहेत . त्याप्रमाणे महानगरपालिके कडून 14 ऑडिटर आणि 9 आरोग्य मित्र 24 हॉस्पिटल मध्ये असे नियुक्ती करणेत आलेली आहे. या लोकांचे 80% व 20% शासनाच्या जी.आर. प्रमाणे दर निश्चित केलेप्रमाणे बिल लावले किंवा नाही . याची पडताळणी झालेनंतर त्यांचे बिल पेमेंन्ट करावयाचे आहे. हे सर्व काम नेमलेल्या ऑडिटर मार्फत करणेत येईल.तसेच 9 आरोग्य मित्र महात्मा फुले अंतर्गत कोणता पेशंट निकष मध्ये बसतो . कोणता पेशंट निकषात बसत नाही . याची पडताळणी करणे. तसेच पेशंटची माहिती व्यवस्थितपणे देणेसाठी आणि पेशंट ऍ़डमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये काही गैरसोय होत असेल तर त्यांचे बद्दल पूर्ण माहिती देणे . आरोग्य मित्रांची जबाबदारी महानगरपालिकेच्या वतीने निश्चित करणेत आली. तसेच याबाबतीत आपल्या काही तक्रारी असतील . तर महानगरपालिकेच्या कंट्रोल रुमचा नंबर आहे . तो आपण घेऊ शकता. डी.सी.एच. आणि डी.सी.एस.सी. हॉस्पिटलमध्ये किती बेड्स शिल्लक आहेत . हे आपल्याला माहितीसाठी लिंक देत आहोत. तो लिंक पुढीलप्रमाणे http://117.247.89.137:85 दिलेल्या लिंकवर आपण 24 हॉस्पिटलची माहिती मिळवू शकता. त्यात एकूण 24 हॉस्पिटलमध्ये किती बेड्स शिल्लक आहेत आणि किती आय.सी.यु. बेड्स उपलब्ध आहेत, किती वेंटिलेटर उपलब्ध आहेत . याची माहिती घेऊन त्याप्रमाणे उपचार घेऊ शकता. तसेच डी.सी.एस च्या हॉस्पिटलमध्ये फक्त कोविड हॉस्पिटल म्हणून आम्ही या ठिकाणी घोषित केलेले आहे. त्याठिकाणी फक्त सिरियस पेशंटचा उपचार व्हावा . यासाठी आज महानगरपालिकेच्या वतीने आदेश देण्यात आले आहे.
कोविड हॉस्पिटलमध्ये कोणताही पेशंट आला . त्याला डी.सी.एच. मध्ये ऍ़डमिट करुन घेतला पाहिजे. तसेच आलेल्या पेशंटला प्रायमरी ट्रिटमेंन्ट करावे. नंतर आमच्या सी.सी.सी. सेंटरला रेफर करावयाचे आहे. झोपडपट्टीच्या बाहेर जर घर असेल तर त्यांना होम आयसोलेशन पण उपलब्ध करणेत येत आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करणेस महानगरपालिकेच्या वतीने आदेश दिलेले आहे. डी.सी.ए. आणि डी.सी.एस.सी. यांचे कडे एकूण 940 बेड्स महानगरपालिकेच्या वतीने कोविडसाठी परवानगी दिले आहे. याव्यतिरिक्त आम्ही 107 नविन बेड्स कोविडसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच महानगरपालिकेने बलवंत इन्स्टिीट्युट न्युरोलॉजी, लाईफ लाईन हॉस्पिटल व अपेक्स हॉस्पिटल असे तीन अतिरिक्त हॉस्पिटल कोविडसाठी अधिग्रहित केलेले आहेत. तसेच धनराज गिरजी हॉस्पिटल, नर्मदा हॉस्पिटल व स्पर्श हॉस्पिटल मध्ये कोविडसाठी बेड्स वाढविले आहेत. यामध्ये जो रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍ़डमिट होतात . त्यांचेसाठी व्यवस्थितपणे उपचार होतील . असे नियोजन महानगरपालिकेच्या वतीने केलेले आहेत. तसेच आपणांस कोविड बाबतीत काही तक्रारी असतील . तर आमचा कंट्रोल रुमचा लँन्डलाईन नंबर 0217-274034 व मोबाईल नंबर 9607943100 यावर आपले काही तक्रारी असतील . तर आमच्या यंत्रणेशी संपर्क साधावा.