मा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य ११ हजार मास्कचे वाटप

सोलापुर /ता: २४

             अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त जि. प . शेस फंडातुन ११००० मास्क व साईनिटायजर वाटप करण्यात आले. या वेळी पंचायत समिती विरोधी पक्ष नेते गुंडप्पा पोमाजी ,जि प माजी सदस्य विजयकुमार ढोपरे, अॅड अमितकुमार रमेश कोतमिरे , वैद्यकिय अधिकारी अभिजीत काटे, डॉ. राजकुमार नडगेरी, डॉ. शरणकुमार वरनाळे, डॉ प्रदिप पोमाजी, डॉ राजकुमार कलशेट्टी, डॉ स्वामींनाथ बु-हाणपुरे, डॉ हळुरे, ग्रामसेविका रेखा बिराजदार, श्रीशैल ढोंबरे, सुनिल आवळे, राजु खोबरे, मा. तंटामुक्त अध्यक्षा लक्ष्मीबाई पोमाजी, आरोग्य सेविका नदाफ ,सर्व आशावर्कर व असंख्यग्रामस्थ उपस्थित होते
                यावेळी बोलताना आनंदमालक तानवडे (सदस्य ,जि. प . सोलापूर) म्हणाले की, कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेची असल्याचे सांगितले. बाहेर येताना मास्क वापरणे, साबणाने दर दोन तासानी हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सर्दी, खोकला, तीव्र स्वरूपाचे ताप व घसा दु:खी असेल तर वैद्यकिय तपासणी करून घेणे . कोरोना विषयी भीती न बाळगता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून रोगाची निदान करून घेणे महत्वाचे असल्याचे डॉ अभिजीत काटे यांनी स्पष्ट केले. या वेळी डॉ. शरणकुमार वरनाळे यांनी मास्क व सॅनिटायजर वाटप करत असल्याबध्दल समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!