जयसिंगपूर / ता : २३
उदगांव (ता. शिरोळ) येथील गजानन धोंडिबा चौगुले (वय- 55) या इसमाने दारूच्या नशेत राहत्या घरी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी 11.30 पूर्वी घडली आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गोकुळ डेअरी समोर गजानन धोडिंबा चौगुले यांनी आपल्या घरामध्ये दारूच्या नशेत लाकडी वाशाला दोरीच्यासाह्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत महावीर गजानन चौगुले यांनी वर्दी दिली आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.