तबेल्यामुळे नागरी जीव धोक्यात ; ८५ मालकांना नोटीसा

सुर्यकांत देशपांडे
वसई /ताः २१

         वसई विरार शहराच्या महानगरपालिका क्षेत्रातील बेकायदेशीर तबेल्यामुळे परिसरातील प्रदूषण वाढले आहे . प्रशासनाने वेळीच संबंधितावर कडक कारवाई न केल्यास येथील नागरिकांच्या आरोग्य समस्या वाढणार आहेत.
            याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , वसई पूर्व कामण व वालिव येथील परिसरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात तबेले असून ते जवळपास शंभरच्या आसपास असून त्यात हजारो जनावरे आहेत . या जनावरांचे मलमूत्र सतत परिसरातील गटार व नाल्यातून येथील तलाव व तसेच विहीरीत मिसळते आहे. तसेच परिसरातील कामण नदी अरुंद आणि प्रदुषित झाली आहे.

            शिवाय येथील हवेत प्रदूषण वाढले असुन परिसरातील नागरिकांना शुध्द पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावु लागले आहे. याबाबत मनपा प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे . याचा फायदा घेणाऱ्या तबेले मालकांच्या बेफिकीर बाबत आता येथील रहिवाशांनी आवाज उठविला असुन,मनपा प्रशासनाने या बाबत आता या तबेले मालकांपैकी ८५ जणांना नोटिसा काढल्या असुन,त्यांना त्वरीत जनावरांचे मलमूत्र बाहेर न सोडता,त्या साठी गोबरगॅस प्लान्ट उभारणे बाबत आदेश वजा सुचना केलेल्या असल्याचे समजते.

error: Content is protected !!