माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्यावर खंडणीचा गुन्हा

हातकणंगले / ताः ४

         इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी साहेब रजपुते यांच्या विरूद्ध 20 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे .याबाबतची तक्रार शितल आदिनाथ केटकाळे यांनी दिलीआहे .
हातकणंगले तालुक्यातील माणगांववाडी येथे माजी उपनगराध्यक्ष रवी साहेब रजपुते यांच्या शाहुराजे मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था,होलार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था आणि रवीचंद्र महीला मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था या संस्था बंद स्थितीत आहेत.त्या चालु करण्यासाठी रजपुते यांनी उद्योजक शितल आदीनाथ केटकाळे यांचे कडुन 20 लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार शितल केटकाळे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास प्रशिक्षणार्थी डीवायएसपी प्रणिल गिल्डा करीत आहेत.

error: Content is protected !!