वीज बील दरवाढी विरोधात सहभागी व्हा -मा . खा . राजु शेट्टी

 

हातकणंगले /ता : १०

लॉकडाउनच्या काळामध्ये प्रत्येकाचे घरगुती वीजबील भरमसाठ वाढून आले आहे. याच काळात वीज दर वाढ सुद्धा झालेली आहे . सध्या शेतकरी तोट्यात गेला आहे . घरी बसुन राहील्यामुळे रिकाम्या हाताला काम नाही . बेरोजगारी वाढलेली आहे . शासनाला वांरवांर कळवुनकडून सुद्धा याची फारशी दखल शासनाने घेतलेली नाही . त्यामुळे शासनाबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे . तरी लॉकडाऊनच्या काळातील दिल्ली सरकारच्या धर्तीवर वीजबीले माफ करावीत . यासाठी १३ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व मा . खास .राजु शेट्टी यांनी सांगितले असुन यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे .
प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीसमोर सकाळी अकरा वाजता व तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारा वाजता वीज बिलांची होळी करण्याची आहे . आंदोलन करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे. व कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी . सरकारला त्रास देण्याचा उद्देश नसून सामान्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या आहेत असे शेट्टी यांनी सांगितले आहे .

error: Content is protected !!