हातकणंगले पोलिसांची गावठी अड्डा व विदेशी मद्य विक्रीवर कारवाई

हातकणंगले/ ता : 9

                 येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोरील गोसावी गल्ली येथील गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर टाकून सौ . प्रिया कुंदन गायकवाड (वय :२६ वर्ष रा . पेठा भाग , हातकणंगले ) या या महिला आरोपीस पकडले . कारवाईत ७८०/- रुपयाची देशी दारू जप्त केली आहे .तसेच हेरले येथील सावली हॉटेल जवळ उघड्यावर बेकायदेशीर विदेशी दारू विकताना चंद्रकांत मल्लापा बागणी (वय 37 रा . रूकडी ) याला पोलिसांनी पकडले विदेशी मद्याची किंमत १४८६६ / – रुपये आहे . ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पो .कॉ. शंकर पाटील , सविता कांबळे , सुहास गायकवाड ,सागर पवार ,संदीप कांबळे , कृष्णा माने , मोहिते , दिग्विजय देसाई , राकेश इंदुलकर लक्ष्मणराज सावंत , शेटे यांनी केली असून पुढील तपास मनोज मोहिते करीत आहेत .

error: Content is protected !!