अखेर सर्व जण निगेटिव्ह

हातकणंगले /ता: २५

                आळते (ता.हातकणंगले)येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तेरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गावातून समाधान व्यक्त होत आहे . हुपरी येथील जवाहर साखर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह त्याची दोन मुले , सून , पुतण्या पॉझिटिव्ह आढळले होते . त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची बुधवार तारीख 22 रोजी तपासणीसाठी नमुने घेतले होते . चार दिवस रिपोर्ट आले नसल्याने संपूर्ण प्रभाग चिंतेत होता .

            अखेर आज तेरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे . दरम्यान 13 जणांना चार दिवसापासून क्वारंटाईन केले होते .

error: Content is protected !!