पंडितकाकांच्या स्मरणार्थ फाय ग्रुपने केले धुळोबा डोंगरात वृक्षारोपण

हातकणंगले / ता : १९

            देशातील थोर उद्योगपती व फाय उद्योग समूहाचे संस्थापक पंडितकाका कुलकर्णी यांचे सहा जुलै रोजी निधन झाले . त्यांनी इचलकरंजीचे शहराचे नाव जगाच्या नकाशावर उमटविले आहे . उद्योग व्यवसायातुन निवृत्ती घेतल्यानंतर अनेक वर्ष ते विरंगुळा व पर्यटनासाठी दररोज सकाळी श्री.क्षेत्र रामलिंग व धुळोबा डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात येत होते . येथील प्रत्येक डोंगर व टेकडीशी त्यांचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष संवादासोबत सहवास असायचा . त्यांच्या स्मृति सदैव आठवणीत राहाव्यात . या उद्देशाने फाय ग्रुपच्या वतीने धुळोबा देवालयाच्या समोरील टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले .

             यामध्ये कदम्ब, वड, कडूलिंब, कांचन, सोनचाफ़ा, बकुळ,उम्बर ,आंबा करंजा ,गुलमोहर , बहावा , ताम्हण ,जांभळ ,चिंच अशा अनेक औषधी रोपांचा समावेश आहे . रोपांची जपणूक फाय ग्रुपच्या मार्फत करण्यात येणार असून झाडे मोठी झाल्यानंतर त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे . यावेळी अरविंद देशपांडे, मनोज लक्षमेश्वर, भावीक देशपांडे, मुग्धा देशपांडे, असीम कुलकर्णी, अमोद कुलकर्णी, मयूर लक्ष्मेश्वर, हेमंत कुलकर्णी, दीपक कट्टी, प्रफुल्ल, स्वानंद कुलकर्णी, हातकणंगले पंचायत समितीचे मा. सभापती अविनाश बनगे , आळतेचे माजी सरपंच संजय दिक्षित ,पत्रकार रोहन साजणे , सागर सुतार , अक्षय भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .

error: Content is protected !!