तेरा पॉझिटिव्ह पैकी एक मृत ; नागरिकात घबराट

हातकणंगले /ता : १८

                 हातकणंगलेत आज आणखी पाच पॉझिटिव्ह नवीन रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे एकूण रूग्णसंख्या तेरा झाली आहे . तर त्यातील एक मृत झाला आहे . मृताच्या घरातील तीन तर माजी सरपंच यांच्या घरातील व शेजारील असे एकूण नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत . त्यामुळे हातकणंगले नगरपंचायत हद्दीत घबराट पसरली आहे . संपूर्ण शहर लॉकडाऊन केले आहे . हातकणंगले -इचलकरंजी मेन रोड वगळता शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत .

error: Content is protected !!