टोप / ता : १८
कासारवाडी येथील चौदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विधायक कामांना प्राधान्य देत एक गाव एक गणपती प्रतिष्ठापना करण्याचे ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. बैठकीला शिराेली पाेलिस ठाण्याचे
सहाय्यक पाेलिस निरीक्षक किरण भाेसले व सरपंच साै . शाेभाताई खाेत उपस्थित हाेते.
काेराेणाच्या वाढत्या संसर्गामुळे गणेश उत्सव मंडळानी साध्या पध्दतीने व विधायक व समाजउपयाेगी उपक्रम राबवुन एक गाव एक गणपती उपक्रम राबबावा असे आवाहन सहाय्यक पाेलिस निरिक्षक किरण भाेसले यांनी केले . त्यानुसार सर्व गणेशोत्सव मंडळानी त्याला एकमताने मान्यता देत एक गाव एक गणपती प्रतिष्ठापना करणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले. यावेळी काेराेणा बाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस उपसरपंच साै . साधना खाडे, साै वैशाली वरुटे, नेताजी चेचरे, आण्णाप्पा पाेवार , धनाजी निकम, पाेलिस पाटील महादेव सुतार, विलास खाेत, शंकर वागवे, कुमार पाेवार , लखन माने, लखन लुगडे, पांडुरंग लुगडे,शिवाजी घाटगे,पाेलिस संजय जगताप,अविनाश पाेवार आदि उपस्थित हाेते.आभार नेताजी चेचरे यांनी मानले.
