कोल्हापूर /ताः २५
जिल्हा पुरवठा कार्यालयात आठ ते दहा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता . आज उपजिल्हाधिकारी यांच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे .यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोणाचा प्रवेश झाल्याचे निश्चित झाल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे . या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी व त्यांचे दोन लिपिक , दोन शिपाई हे क्वारंटाइन झाले आहेत . दहा दिवसात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली असून प्रतिबंधक उपाय योजना तातडीने करणे गरजेचे आहे .