घुगे प्रकरणी अतुल गांधले यास सशर्त जामीन मंजूर

प्रमोद गोसावी
सोलापुर / ता :१७

                    कृषी सहाय्यक अंगदराव घुगे यांचे अपहरण करून खुनानंतर प्रेत लऊळ हद्दीत आणून टाकल्या प्रकरणातील संशयित आरोपी अतुल गांधले यास बार्शी न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजुर केला आहे . या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिसात दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी गुन्हा दाखल झाला होता . तपासानंतर मृताची पत्नी, मुलगा, ड्रायव्हर, प्रसाद व अतुल गांधले अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.
                   अतुल गांधले यांनी बार्शी सेशन कोर्टात जामीनासाठी अॅड. रूपाली दत्तात्रय तारके (बार्शी ) व अॅड. प्रशांत प्रभाकर पाठक (माढा ) यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती निर्दशनास आणून देऊन त्यांच्याविरुद्ध कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नसल्याचा सुनावणीदरम्यान युक्तिवाद अॅड. रूपाली तारके यांनी केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अतुल गांधले यास कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर व न्यायालयाने नेमून दिलेल्या तारखेशिवाय बार्शी तालुका हद्दीत प्रवेश न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. डी. डी.देशमुख यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!