मुंबई /ताः २६
महाराष्ट्र हिंदुमहासभा अभेद्य असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांना राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमुखाने समर्थन देत आहेत, असा ठराव अखिल भारत हिंदुमहासभेच्या महाराष्ठ्र प्रदेश पदाधिकारी बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. राज्यात संघटन वाढीवर भर देण्यात यावा, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
अखिल भारत हिंदुमहासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झूम अँपद्वारे घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि 27 राज्यांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. यावेळी अखिल भारत हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्रिदंडी स्वामीमहाराज आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र दुवेदी यांना पक्षविरोधी कारवाया केल्याने पदमुक्त करण्यात येवून हिंदुमहासभेतून तहहयात निष्कासित करण्यात आले होते. त्यानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून अद्भुत बाबा यांची निवडही करण्यात आली होती. यामुळे त्रिदंडी स्वामी आणि रवींद्र दुवेदी या दोघांनी सोशल मीडियाद्वारे देशभरात विविध बातम्या पसरवून आणि नियक्ती पत्र देवून संभ्रम निर्माण करण्यास सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांना पदमुक्त केल्याचे पत्र या दोघांनी व्हायरल केले होते. या पार्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभेच्या पदाधिका-यांची झूम अँपद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व घडामोडींची माहिती राज्यातील पदाधिका-यांना देण्यात आली. नंतर या बैठकीत श्री . केणी यांना एकमुखाने पाठिंबा देण्यात आला . आणि महाराष्ट्र हिंदुमहासभा एकसंध असल्याचा ठराव कऱण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अद्भुत बाबा यांचे अभिनंदन कऱणारा ठरावही यावेळी कऱण्यात आला.
बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश भोगले, राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. गोविंद गांधी, प्रदेशाध्यक्ष अनुप केणी, कोषाध्यक्ष महेश सावंत, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद तिवारी आणि नंदकुमार घोरपडे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा दीपाली खाडे, प्रदेश प्रवक्ता आनंद कुलकर्णी, विभागीय संघटक नारायण अग्रवाल, प्रदेश समन्वयक संजय कुलकर्णी, ठाणे जिल्हा कार्यवाह गोविंद पवार, अमरावती जिल्हाध्यक्ष विक्रांत अलगुजे, सातारा जिल्हाध्यक्ष अँड. दत्तात्रय सणस, जळगाव जिल्हाध्यक्ष रमेश सुशिर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप यांच्यासह संग्रामसिंह गायकवाड, बबिता लखन काळे, गणेश कदम, रमेश कराळे, दिलीप मेहेंदळे, मारुती मिरजकर, राजेंद्र शिंदे, राजेश मेथे, हसित त्रिवेदी, उमेश गांधी, हरिश शेलार हे कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते.