गैरव्यवहार चौकशीसाठी रावळगाव स्वयंस्फूर्तीने बंद

मालेगाव /ता : 15

                 सन २०१५ ते २०२० या कालावधीत मालेगाव तालुक्यातील रावळगाव ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याचे निवेदन शंभरपेक्षा अधिक ग्रामस्थांनी सह्याचे निवेदन पंचायत समितीमध्ये दिले आहे . गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी व कारवाईसाठी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने उस्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला . यावर पंचायत समितीने विस्तार अधिकारी यांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत .

                    निवेदनात म्हटले आहे कि , जलवाहिनी , विहिरीला आडवे बोअर , शौचालय बांधकाम , एलईडी दिवे , चौक सुशोभिकरण आदि कामासाठी निधी मूरविल्याचा आरोप केला आहे . त्याच बरोबर पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची मागणी केली आहे . निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी व व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत

error: Content is protected !!