सोलापूर [ताः २६]/ प्रमोद गोसावी
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल फाऊंडेशन आणि सोलापमहापालिकेच्यावतीने हुचेश्वर नगर येथे शनिवारी डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रॅपिड एंटीजन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 63 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तीनजण कोरोनाबाधित आढळले.

या शिबिरात शिवगंगा नगर, पारशी विहीर, म्हेत्रे वस्ती, अंबिकानगर, बालशिवयोगी नगर यासह परिसरातील 50 वर्षांच्या पुढील नागरिकांची एंटीजन टेस्ट करण्यात आली. शिबिरासाठी लोकमंगल फाउंडेशनचे विभाग प्रमुख पांडुरंग जाधव, दिपाली नंदुरकर, नितीन जाधव, नई जिंदगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर हिप्परगी, डॉ वांगीकर, नियंत्रक अधिकारी रजपूत, सहाय्यक नियंत्रक अधिकारी, पाटील, चिवडशेट्टी, पवार आदींनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी चद्रकांत म्हेत्रे ,लक्ष्मण म्हेत्रे आणि परिवाराने जागा उपलब्ध करून दिली. यावेळी बाळू गोणे, शिवसिंग वाले, भीमराव कुंभार, सुरवसे व इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिबिरामध्ये आढळलेल्या तीन कोरोनाबाधित व्यक्तींवर शासन निर्णयानुसार महात्मा फुले योजने अंतर्गत उपचार करण्यात येणार आहेत. मोफत उपचारासाठी दिनांक २३ जुलै २०२० च्या शासन निर्णयाची प्रत व आधार कार्ड, रेशनकार्ड संबंधित रुग्णालयात सादर करणे अनिवार्य आहे, असे यावेळी सांगण्यात आले.