पोलिसांच्या प्रामाणिक दक्षतेमुळे हरवलेले दहा हजार रुपये मिळाले परत

जयसिंगपूर / ता: २५

               उदगाव (ता .शिरोळ ) गावातील रहिवाशी सुभाष महादेव साळुंखे यांचे अंकली टोलनाक्यावर दहा हजार रुपये खिशातुन पडले. अवध्या एक तासातच हे पैसे टोलनाक्यावरील पोलिसांनी शोधून साळुंके यांना परत दिले . या प्रामाणिकपणामुळे अंकली टोलनाक्यावर कार्यरत असणाऱ्या सर्व पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे .

हरवलेले दहा हजार रूपये परत देताना पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील व अन्य सर्व

             सांगली येथील एका संबंधित व्यक्तीकडून उदगावच्या साळुंके यांनी चाळीस हजार रुपये हातउसने घेतले होते. चाळीस हजार रुपये सांगलीकर व्यक्तीस गरज असल्यामुळे ते परत देण्याकरिता साळुंके अंकली टोलनाक्यावर गेले . साळुंके यांनी गडबडीत खिशातून नोटांचे बंडल काढून समोरच्या व्यक्तीस दिले.अंकली टोलनाक्यावर तैनात असलेला पोलीस बंदोबस्त आणि लॉक डाऊनचे भान ठेवत पैसे न मोजता दोघेही आपापल्या ठिकाणी निघून गेले. दरम्यान पंधरा मिनिटानंतर सांगलीच्या व्यक्तीने साळुंके यांना फोन केला . दिलेल्या रकमेत दहा हजार रुपये कमी असल्याचे सांगितले.साळुंखे यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. भांबावलेले साळुंके पुन्हा टोलनाक्यावर आले. डोळ्यातील पाण्यासह साळूंके यांनी ड्युटीवर असणारे जयसिंगपूरचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांना ही घटना सांगितली.
पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी प्रथम सीसीटीव्ही फुटेज मार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला . मात्र त्या दहा हजाराचा शोध लागला नाही.त्यानंतर ही माहिती ड्युटीवर असणाऱ्या पोलीस , होमगार्ड व वजीर रेस्क्यु फोर्सकडील कर्मचारी यांना बोलवून पैसे शोधण्याची विनंती केली. यावेळी ज्या ठिकाणी देवाण घेवाण झाली होती . त्याच्या काही अंतरावरच सदरचे पैसे जमिनीवर तसेच मिळून आले .
              भांबावलेल्या सुभाष साळुंके अश्रू अनावर झाले. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी हे पैसे साळुंके यांना सुपूर्द केले.पोलीस नाईक विशाल जोग ,पोलीस नाईक दयानंद भोसले व पोलीस शिपाई पंडित पवार यांच्यासह कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्यामुळे साळुंके यांना हे पैसे परत मिळाले. साळुंके यांनी सर्वांचे आभार मानले. यामुळे पोलिसांच्या सतर्क आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे परिसरातून सर्वांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!