रुई ता. हातकणंगले येथील गावभाग परीसरात आज ३६ वर्षीय युवकाला कोरोणाची लागन झाली असलेची माहिती समोर आली आहे. सदर व्यक्ती राहण्यास गावातील तळीभाग परिसरात असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इचलकरंजीतील एका कोरोणा बाधीत व्यक्तिच्या संपर्कात आल्याने त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी संजय घोडावत कॉलेज येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील कुटुंबासह इतर 19 जनांचे स्वॅब तपासणीसाठी संजय घोडावत कॉलेज येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान कोरोना आपती व्यवस्थापन समीतीच्या वतीने सदरचा परीसर तात्काळ सील करून गाव बंद करण्यात आले आहे.