गरीबांचे अश्रु पुसण्यासाठी प्रशासकीय आधिकारी व्हा -उपअधिक्षक प्रणिल गिल्डा

हातकणंगले /ताः ९

         ज्यांना समाजातील गरीब , दुर्बल , दीन दुबळ्याचे अश्रु पुसण्याचे काम करण्याची इच्छा आहे . त्यांनी स्पर्धा परीक्षा देवुन प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न करावेत . त्यासाठी तरुण वयात कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता ध्येय निश्चित करून आव्हान स्विकारण्यासाठी सज्ज राहीले पाहीजे . यासह अनेक महत्वाचे मुद्दे उपअधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले . ते अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर अँडमिनीस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेसच्या वतीने मोफत ऑनलाईन मार्गदर्शन करताना संधी व आव्हाने या विषयावर बोलत होते .

 

ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना उपअधिक्षक प्रणिल गिल्डा व प्राचार्य विराट गिरी …..

            वेबिनारमध्ये स्वागत प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्राचार्य विराट गिरी यांनी केले . वेबिनारमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वैयक्तीक प्रश्र विचारून शंका निरसन करून घेतले . यामध्ये ७५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .
               सी-सॅट विषयाचे तज्ञ उपअधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले . शासन आणि जनता यांना जोडणारा प्रशासन हा दुवा आहे . जनतेच्या गरजा पाहुन शासनाने ठरविलेल्या योजना राबविण्याचे काम प्रशासन करीत असते . प्रशासकीय सेवेत नोकरीची कायमस्वरूपी हमी असते तसेच रोज नवनवीन अनुभव येत असतात . तर खाजगी क्षेत्रात पगाराचे पॅकेज मोठे असते . पण नोकरीचा भरवसा नसतो .
        या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले .यावेळी प्रा.सागर चव्हाण , प्रा.अक्षय पाटील , प्रा.सुर्यकांत कांबळे , प्रा.सुधीर शिंदे , प्रा.श्रीकांत खोत उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!