बारा गावची बैठक शिरोलीत संपन्न

पुलाची शिरोली / ता : १८

                   कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व पुढे उद्भवणारे मोठे संकट टाळण्यासाठी एक गाव एक गणपती संकल्पना सर्वांनी राबवून जिल्ह्यात एक आदर्श निर्माण करावा . असे आवाहन शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी केले. शिरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १२ गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांच्या दक्षता बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते.

         आरोग्य वैद्यकीय अधिकारी जेसीका अॅंन्ड्रूस यांनी सध्या कोरोना फैलाव गावागावात सुरू झाला आहे. याची दक्षता घेण्या संदर्भात लोक प्रतिनिधींनी तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे असे सांगितले. यामध्ये गावातील अलगीकरण कक्ष सुसज्ज असावा. १० वर्षाखालील मुले व ६० वर्षावरील नागरिकांना घरा बाहेर जाण्यास निर्बंध घालणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्क वापरणे . सोशल डिस्टन्स ठेवावे . अन्यथा दंडाची व फौजदारी कारवाई करावी लागेल . फौजदार अतुल लोखंडे यांनी कोरोना पेशंट आढळल्यानंतर खबरदारी बाबतची सूचना व मार्गदर्शन केले.

            यावेळी उपस्थित शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, नागावचे सरपंच अरुण माळी, शिये सरपंच रणजित कदम, मौजे वडगाव सरपंच काशिनाथ कांबळे , तलाठी निलेश चौगुले यांच्या सह सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

error: Content is protected !!