सोलापुर / ताः२०
करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे वडील व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक/अध्यक्ष कर्मयोगी स्व.गोविंद (बापू) पाटील यांचे दुःखद निधन झाले . त्यांनी अनेक दशके करमाळा तालुक्याचे नेतृत्व केले होते . त्यांचे सामाजिक ,सहकार , व तालुक्याच्या विकासामध्ये मोठे योगदान असुन अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणुन त्यांची ख्याती होती .