सिध्दापूर येथे युवकाचा खून ; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूर ता : १७

       कामाचा पगार देतो . असे सांगून संतोष महादेव कोळी (वय 22)याला विषारी शिंदी पाजून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी संशयित म्हणुन मलकाप्पा मल्लाप्पा बिराजदार,म्हांतेश मल्लाप्पा बिराजदार (रा.सिध्दापूर ता.मंगळवेढा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
           पोलिस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की,यातील मयत संतोष महादेव कोळी हा फोटोग्राफर असून तो संशयित आरोपी यांच्याकडे कामाला होता. यातील संशयित आरोपी मलकाप्पा बिराजदार व म्हांतेश बिराजदार यांनी मयतास घरातून बोलावून घेवून त्यास विषारी शिंदी पाजून त्यानंतर मयतास संतोष सोनगे याच्या शेतात नेवून दुकानाची चावी मागितली असता मयतास पगार दिल्याशिवाय चावी देत नाही असे म्हणाल्याने दि. 12 रोजी 8.00 च्या दरम्यान आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला असल्याची फिर्याद महादेव कोळी याने पोलिसांत दिली आहे.या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे हे करीत आहेत.

error: Content is protected !!