सोलापूर / ताः १७
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या संचारबंदी काळात टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना सहकार्य केलेल्या १२३ वॉरीयर्सना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून सतत लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी कलम ही लागू करण्यात आले होते. सध्या दिवसा संचारबंदीतून सवलत देण्यात आलेली आहे.मात्र संचारबंदी काळात पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण होता.या काळात १२३ वॉरीयर्सनी पोलिसांना मदत केली.यामुळे त्यांचा करमाळा उपविभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते त्यांना प्रशंसापत्र देण्यात आले.या प्रसंगी सपोनि अमित शितोळे , किशोर चंदू घेचंद,बाळासो अनपट, राजेंद्र बनसोडे,संदीप भोई,बापू गलांडे,सचिन निकम,तानाजी गायकवाड, तानाजी चमरे,रणजित कांबळे,यश गुरव,समाधान गायकवाड,संभाजी भोसले,आनंद खंडागळे,झारदेवसिंग सुधन,अकबर खान,अतुल डुचाळ,औदुंबर करंडे यांच्यासह अन्य १२३ वॉरीयर्सना प्रशंसा पत्र देण्यात आले.