‘ एक गाव , एक गणपती ‘ साठी सरसावले वडगांव ; तरुण मंडळांचा एकमुखी ठराव

हातकणंगले/ ताः १६

                       कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये ‘ एक गाव एक गणपती ‘ संकल्पना राबवून एक आदर्श निर्माण करावा . गावामध्ये गोरगरीबांना शिधावाटप अथवा गावामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीरे भरवावी . असे मत शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केले.
         मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठकीप्रसंगी बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच काशीनाथ कांबळे होते .

सपोनि किरण भोसले यांना एक गाव एक गणपती आयोजनाचे पत्र देतांना सरपंच काशिनाथ कांबळे शेजारी पीएसआय अतुल लोखंडे उपसरपंच सुभाष आकिवाटे

            सपोनि भोसले पुढे म्हणाले की , गावामध्ये सामाजिक उपक्रम म्हणून कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करावी , तसेच रक्तदान शिबीर , स्पर्धा परिक्षा सारखे उपक्रम राबवून साधेपणाने गणेश उत्सव साजरा करावा त्याचप्रमाणे शाडूच्या मातीचा एक ते दीड फुट उंचीच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापणा करावी . या वेळी गावातील विविध तरुण मंडळांनी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ‘ एक गाव एक गणपती ‘ यासाठी एकमुखी निर्णय घेतल्याबद्दल सर्व मंडळांचे आभार मानले .
             यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अतुल लोखंडे , अविनाश पोवार , उपसरपंच सुभाष आकिवाटे , ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे , अविनाश पाटील , शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे , भाजपा चिटणीस आनंदा थोरवत , तानाजी गोरड , अमोल झांबरे , सुनिल खारेपाटणे , जयदीप रजपूत , शब्बीर हजारी , मोहरम उत्सव समितीचे उस्मानगणी मुल्लाणी ,दिलावर मुल्लाणी , आमीरहमजा हजारी , शकील मुल्लाणी , आदीसह गणेश उत्सव व मोहरम समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .

error: Content is protected !!