जयसिंगपूर /ताः १९
शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक महापुरासह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या हाती लागले नाही . तर शेतकऱ्याच्या अशा खरीप पिकांना केंद्र सरकारने विम्याचे संरक्षण दिले आहे . सर्व शेतकरी बांधवांनी या पीक विम्याचा लाभ घ्यावा . असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले .

शिरोळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रबोधनासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रचार प्रसिद्धी रथयात्रेची सुरुवात राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे झाली .
यावेळी ते बोलत होते, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यावेळी उपस्थित होते . या पीक विम्या बाबत माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी सांगितले . या योजनेमध्ये सोयाबीन व भुईमूग या दोन पिकांचा समावेश होतो .सोयाबीन पिकासाठी विमा हप्ता प्रतिगुंठा नऊ रुपये भुईमूग पिकासाठी विमा हप्ता प्रति गुंठा सात रुपये असा आहे . महापूरासह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे ही पिके जर शेतकऱ्याला घेता आली नाहीत . अथवा या पिकांचे नुकसान झाले तर संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाईपोटी सोयाबीनला प्रति हेक्टर पंचेचाळीस हजार रुपये तर भुईमूगला प्रति हेक्टर पस्तीस हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहेत .तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेबाबत सविस्तर माहिती व्हावी . आणि शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा . म्हणून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये प्रचार प्रसिद्धी रथयात्रा जाणार आहे . आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन करून पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा . यासाठी माहिती देणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी यांनी सांगितले .
यावेळी मंडळ कृषी अधिकारी महावीर गायकवाड अशोक कोडोले यांच्यासह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.