हातकणंगले मतदारसंघात बहुरंगी लढत

माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर

 आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील आणखी 4 उमेदवारांची नावे जाहीर केली. यात हातकणंगले, पालघर, जळगावच्या उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे यांनी सांगितली. 

  तसंच कोल्हापूरची जागा शाहू महाराजांचा मान ठेवून सोडली असल्याचं ते म्हणाले. हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांनी मविआने पाठिंबा द्यावा असं म्हटलं होतं. पण आता हातकणंगलेत उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानं इथं मविआ राजू शेट्टींना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
हातकणंगलेमधून माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता हातकणंगले मधून बहुरंगी लढत होणारे हे निश्चित.
error: Content is protected !!