डिप्लोमा इंजिनीअरिंग मध्ये करिअर संधी

             विद्यार्थी मित्रहो, इ. १० वी ची परीक्षा पास झाल्यानंतर सर्व पालकांना व पाल्यांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महाविद्यालय शिक्षण पूर्ण करण्यासाठी करिअर ची निवड कशी करायची? यासाठी आपल्यापैकी बरेच जण आपले नातेवाईक व मित्रमंडळी यांचा सल्ला घेऊन पारंपरिक चालत आलेल्या शैक्षणिक मार्गाचा विचार करतात व त्यांनी यामध्ये खूप छान प्रकारे यश मिळवले आहे आपण पण यामध्ये नक्कीच यश मिळवू या आशेने त्यांनी जो आपणास सल्ला दिला आहे याच मार्गाने पुढे जातात, यामध्ये सर्वात जास्तरित्या व प्रामुख्याने अवलंबली जाणारी प्रवेश पद्दत म्हणजे सायन्स शाखेस मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे यानंतर सर्व विषयासाठी कोचिंग क्लास लावणे , बोर्ड परीक्षा देणे व ही परीक्षा संपते तोपर्यंत जेईई/ सीईटी यासारख्या प्रवेश परीक्षांना सामोरे जाणे याचे कारण म्हणजे इंजिनिरिंग ला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवणे होय. हा जो मार्ग आपण निवडता तो नक्कीच चुकीचा नाही आहे, पण हा मार्ग तितकाच खडतर देखील आहे कारण या मध्ये जी आपण इंजिनिरिंग साठी पात्रता परीक्षा देत आहात यात जर का आपणास चांगला स्कोर मिळवता नाही आला तर आपण जे स्वप्न पाहिला होतात ते अपूर्णच राहून जाते, व नंतर आपण यावर प्रतिक्रिया देत बसतो, विद्यार्थी मित्रहो, तोपर्यंत वेळ निघून जाते व आपण पुढे काय करायचे या चिंतेने ग्रस्त होऊन जातो. बऱ्याच वेळा यामध्ये काही विद्यार्थी १२ सायन्स मध्ये कमी मार्क्स मिळाले मग करायचे काय तर मग ते डिप्लोमा इंजिनिरिंग चा विचार करत असतात, आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. विद्यार्थी मित्रहो, आपण जर १० वी व १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण आहात व आपण इंजिनिरिंग ला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर आपण एक वेळ डिप्लोमा इंजिनिरिंगचा नक्कीच विचार करावा.

           १० वी उत्तीर्ण झालेनंतर पारंपरिक शिक्षण घेणे म्हणजेच सायन्स ही शाखेस प्रवेश घेणे, या शाखेचा विचार थोडा बाजूला ठेवून देखील आपण एक उत्कृष्ट अभियंता बनू शकता? हे कसे, तर यासाठी आपणास जास्त टक्केवारी मिळायला हवे, कोचिंग क्लासेस किंवा अकॅडमी जॉईन करणे यापैकी काहीच करावे नाही लागत, आपण आपल्या बुद्धीमत्तेच्या आधारे साधारण मार्क्स मिळवून देखील उत्कृष्ट दर्जाचे अभियंता बनू शकता, जगाच्या पाठीवर असे बरेचसे उदाहरणे आहेत की ज्यांनी फक्त डिप्लोमा इंजिनिरिंग पूर्ण करून उद्योग जगात आपला ठसा उमटवला आहे उदाहरण द्यायचे झाले तर होंडा कंपनीचे संस्थापक सोयचिरो होंडा हे डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनीअर आहेत.अशीच बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. आपणही यामधील एक असू शकता यासाठी आपणास डिप्लोमा म्हणजेच पदविका साठी प्रवेश घ्यावा लागतो, व हा प्रवेश देखील अगदी सहजपणे मिळवू शकतो.

            आपल्या महाराष्टात हे डिप्लोमा इंजिनिरिंग कोर्स महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याशी संलग्न आहेत व हे सर्व कोर्सेस ए आय सी टी इ आणि डी टी इ मान्यताप्राप्त आहेत, शिवाय या कोर्सेस ना महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती देखील उपलब्ध आहेत, याचाच अर्थ सायन्स च्या तुलनेमध्ये आपण एकदम कमीत कमी फी मध्ये आपले अभियंता होण्याचे स्वप्न शासकीय किंवा खाजगी पदविका महाविद्यालयात पूर्ण करू शकता. सध्या पालक व विद्यार्थी खूप सुज्ञ आहेत ते पदविका महाविद्यालयाची निवड करताना प्लेसमेंट, एनबीए मानांकन, एमएसबीटीई उत्कृष्ट दर्जा हे सर्व निकष पडताळून पाहतात.

            महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई हे मुळातच एक स्वायत्त बोर्ड आहे, याचाच अर्थ दिवसेंदिवस बदलत असलेले नवनवीन तंत्रज्ञान डिप्लोमा अभ्यासक्रमात समावेश करून अभियंत्यास एकदम सोप्या व समजेल अशा भाषेत शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात जाऊन त्याला ट्रेन देखील केले जाते, डिप्लोमा इंजिनिरिंग हा ३ वर्षाचा आहे, हा कोर्स पूर्ण केले नंतर नामांकित सहकारी व खाजगी औद्योगिक क्षेत्रात भरपूर प्रमाणात नोकरी व व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.

            आपणासमोर एक महत्वाची गोष्ट सांगायचे म्हणजे, आपण जर ११ वी सायन्स शाखेत प्रवेश घेतला, तर आपण २ वर्षात बोर्ड परीक्षा देतो. यानंतर आपण सीईटी किंवा जेईई परीक्षा देण्याची तयारी करतो व इथे मिळालेल्या मार्कंच्या आधारित आपणास डिग्री महाविद्यालयात प्रवेश मिळतो म्हणजेच सायन्स शाखेत २ व डिग्री इंजिनिरिंग चे ४ असे एकूण ६ वर्ष आपणास लागतात, हेच जर आपण डिप्लोमा इंजिनिरिंग ला प्रवेश घेतला तर ३ वर्ष डिप्लोमा व ३ वर्ष डिग्री असेही ६ वर्ष लागतात इथे आपणास डिग्री ला थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो व डिग्री प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा आपणास द्यावी लागत नाही. याबरोबरच डिप्लोमा मध्ये आपण शिकलेल्या बराच भाग आपणास डिग्री मध्ये देखील असतो यामुळे डिग्री इंजिनिरिंग अगदी सहजरीत्या आपण पूर्ण करू शकता. आणि डिग्री इंजिनीअर च्या तुलनेत नोकरी ऑफर करण्यासाठी डिप्लोमा इंजिनिअर चा सर्वात प्रथम विचार केला जातो.

          ज्या विद्यार्थी मित्रांचे इंग्रजी या विषयामधील ज्ञान एकदम साधारण असते, व ज्यांना इंग्रजी या विषयामध्ये शिक्षण घेण्याची भीती वाटते असे विद्यार्थी देखील अगदी सहजपणे डिप्लोमा इंजिनिरिंग पूर्ण करू शकतात. याचाच अर्थ असा की डिप्लोमा ला पूर्ण करणेसाठी इंग्रजी मध्ये एकदम प्रभुत्व असायला हवे असे काहीच नाही.

          आपण हा ३ वर्षाचा पदविका कोर्स पूर्ण केला व आपणास जर डिग्री करायचे नसेल तर आपणासमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत , यातील पहिला पर्याय म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे एम.एन.सी, शासन आधीरित्या अंतर्गत आणि खाजगी औद्योगिक क्षेत्रात आपण सहजपणे व आकर्षक सॅलरी असलेली नोकरी मिळवू शकता, ही नोकरी आपणास ऑफर करणेसाठी डिप्लोमा अभियंता चा नक्कीच विचार केला जातो याचे महत्वाचे कारण म्हणजे डिप्लोमा करत असताना आपण मिळवलेले प्रात्यक्षिक ज्ञान आणि आपल्या अंगी असलेले कौशल्ये. याबरोबर आपण विविध प्रकारची जर स्पर्धा परीक्षा दिलात तर आपणास शासकीय व निमशासकीय क्षेत्रात देखील नोकरी व व्यवसाय करण्याचे भरपूर प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, आपण जर आपला स्वतःचा व्यवसाय चालू करणार असाल तर केंद्र व राज्य शासनातर्फे आपणास फंड देखील मिळतो.

            डिप्लोमा इंजिनीरिंग मध्ये जवळपास ५८ हुन अधिक शाखेतून आपण शिक्षण घेऊ शकता. सध्या विद्यार्थी व पालक डिप्लोमा इंजिनिरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी कोअर शाखेस प्राधान्य देतात यामध्ये मेकॅनिकल इंजिनिरिंग, सिव्हिल इंजिनिरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग या शाखा आहेत. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या तीन इंजिनिरिंग मधील कोअर शाखा आहेत, या शाखेमधील मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण इंजिनिरिंग मधील बऱ्याच क्षेत्रात यश संपादन करू शकतो. तसेच सध्या डिजिटल इंडिया व कोरोनाच्या या महामारीत सर्वात जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेली क्षेत्रे म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स इंजिनीरिंग व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग. त्यामुळे या दोन शाखेला सुद्धा विद्यार्थी आपली पसंती देतात.
             चला तर मग विद्यार्थी मित्रहो, आपणास उपलब्ध होत असलेल्या एका संधीचा योग्य वापर करून आपण एक उत्कृष्ट दर्जाचे अभियंता व्हा  

               प्रा. नितीन पाटील
विभागप्रमुख
इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिपार्टमेंट
संजय घोडावत पॉलीटेक्निक, अतिग्रे

error: Content is protected !!