नागाव येथील ग्रामदैवत श्री. खणाईदेवी यात्रा रद्द -सरपंच अरुण माळी ;स्थानिक दक्षता समितीचा निर्णय

शिरोली / ताः २ वार्ताहर

   नागाव (ता.हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री. खणाईदेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय स्थानिक दक्षता समितीने आज जाहीर केला आहे. या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण माळी होते .

   सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत खणाईदेवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. पण गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रा रद्द करणे . स्थानिक समितीला भाग पडले आहे. गतवर्षी महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. तर सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे . यामुळे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होणार नाहीत. याबाबतचा निर्णय आज स्थानिक लोकप्रतिनिधी , दक्षता समिती व यात्रा समिती यांच्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला .

   याप्रसंगी सरपंच अरुण माळी ,उपसरपंच सौ . शशिकला कोळी ,पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत ,पोलीस पाटील बाबासाहेब पाटील, विजय पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष अशोक ऐतवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .

खणाईदेवी यात्रा रद्द केले असल्याचे पञ शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण भोसले यांना देताना सरपंच अरुण माळी व अन्य मान्यवर

error: Content is protected !!