जयसिंगपूर /ताः ४
संपूर्ण लॉकडाउन काळामध्ये अग्रेसर राहुन अविरतपणे काम करणाऱ्या जयसिंगपूरच्या विद्यमान नगराध्यक्षा व एक माजी नगराध्यक्षाचा अहवाल मंगळवारी दुपारी पॉझिटिव्ह आला. तब्येत बिघडल्यामुळे ३ दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी त्यांनी स्लॅब तपासणी करीता दिला होता. तर गल्ली क्रमांक बारा येथे आढळलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णांची माजी नगराध्यक्षा पत्नीचा ही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे शाहूनगर भागातील आणखी एक असे जयसिंगपूर शहरात मंगळवारी दिवसभरात एकूण तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. जयसिंगपूरात मोठी खळबळ उडाली , असून विद्यमान नगराध्यक्षांच्या संपर्कातली यादी मोठी असल्यामुळे नगरपालिका वर्तुळात घबराटीचे वातावरण पसरले आहे .
चार महिन्यांत लॉकडाउन कालावधीमध्ये नगराध्यक्षांनी आपले कर्तव्य बजावले होते. मागील चार दिवसांपासून त्यांची तब्येत बिगडली होती. कोरोना आजाराची लक्षणे आढल्यामुळे त्यांनी एक ऑगस्ट रोजी आपला स्लॅब तपासणी करीता दिला होता.तो मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान मंगळवारी सायंकाळी गल्ली क्रमांक आठ येथे प्रतिबंध क्षेत्र जाहीर करुण , दहाव्या गल्ल्यीतील हॉस्पिटल आणि नगरपालिका या ठिकाणी सॅनिटायझर औषध फवारणी करण्यात आली. तसेच नगराध्यक्षा कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरात आपले कर्तव्य बजावत असताना . त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता . त्याची यादी बनवण्याचे काम सुरू आहे.