जयसिंगपुर / ताः १७

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली, राज्यशासन, जिल्हा व तालुका प्रशासन प्रभावीपणे काम करीत आहे, पण गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः इचलकरंजी, चंदगड, कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आरोग्य विभाग व प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. आपण गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका, सोशल डिस्टनसिंगचे पालन करा.आपल्याला कोरोना होणारच नाही असं डोक्यात ठेवून काही जण गर्दी करत आहे. त्यामुळे रोगाचा फैलाव वाढत आहे. स्वःताच्या जिवाला जपा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे मात्र त्यात तुमचा सहभाग महत्त्वाचा अपेक्षित आहे. प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्यावी अशी विनंती. नाम .राजेंद्र पाटील-यड्रावकर
यांनी केली आहे .