नरंदेत पतीपत्नी पॉझिटिव्ह गाव ; तीन दिवस लॉकटाऊन

हातकणंगले / ता.१७

नरंदे (ता. हातकणंगले ) येथील पतीपत्नीचे स्वॅब कोरोना पॉझीटीव्ह आल्याने त्यांना मिरज येथील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे .कोरोना आपती व्यवस्थापन समितीच्या वतीने नागरिकांनी तीन दिवस घरातुन बाहेर न पडण्याच्या सुचना देवुन लॉकडावुन केले आहे .
नरंदे येथील पती -पत्नी सांगली येथील मुलीच्या सासऱ्याचे निधन झाले म्हणुन गेले होते . निधनानंतरचे सर्व विधी तीन दिवसात पुर्ण करायचे याकरिता मुलीचे आई वडील सांगलीत राहीले . त्यानंतर सर्व विधी आटोपल्यानंतर नरंदे येथे आले . दोन दिवसानंतर त्यांच्या मुलीस त्रास जाणवु लागल्याने स्वॅब तपासणी केली . त्यानंतर तिच्या पतीचीही तपासणी केली असता दोघांचेही नमुने पॉझिटीव्ह आले.
त्यानंतर नरंदे येथील पती -पत्नीचा तीन दिवस संपर्क असल्याने त्या दोघांचे स्वॅब तपासणी केली असता आज दुपारी त्यांचे रिपोर्ट पॅाझीटीव्ह आल्याने नरंदे गावात खळबळ उडाली . आज दुपार पासुन कोरोना आपती व्यवस्थापन समितीच्या वतीने संपुर्ण गाव तीन दिवसासाठी लॉकडावुन केले आहे .

नरंदे गाव तीन दिवसासाठी लॉकडावुन करुन गावभागात येण्याचे मार्ग बंद केले आहेत
error: Content is protected !!