नेज येथे मा. आम. मिणचेकर यांच्या हस्ते साहित्य वाटप

हातकणंगले /ता : १३

           नेज ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत कर्मचारी , आरोग्य व आशा कर्मचारी यांना मा.आम . डॉ . सुजित मिणचेकर यांच्या हस्ते जीवनावश्यक सामुग्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी मा.आम.मिणचेकर यांनी कोरोना कालावधीत सेवा केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले .यावेळी सरपंच दिपीका पोवार, उपसरपंच मंजुश्री शिंगे , ग्रामपंचायत सदस्य, सदस्या ,शिवसेनेचे नेते बाबासाहेब शिंगे, संग्रामसिंह निंबाळकर ग्रामसेवक सुखदेव वाडकर , सुधीर कुंभार , नेमिनाथ पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नेज (ता . हातकणंगले ) येथे मा .आम . मिणचेकर यांच्या हस्ते सामुग्री वाटप करताना अन्य मान्यवर
error: Content is protected !!