रुईत जैन प्रीमियर लीग-3 उत्साहात संपन्न

रुई/राकेश खाडे

आंनद ग्रुप विजेता तर खूळ स्मॅशर्स उपविजेता….

    दिगंबर जैन समाज रुई यांच्या वतीने आयोजित जैन प्रीमियर लिग सीजन तिसरे या डे नाईट हाफ स्पीच क्रिकेट (cricket match) मालिकेत विनोद आबदान यांच्या आनंद ग्रुप हा संघ विजेता ठरला तर रोहन खूळ यांचा खूळ स्मॅशर्स हा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

     जैन प्रीमियर लीग या क्रिकेट मालिकेत सुमारे 100 खेळाडूंनी भाग घेतला होता. या खेळाडू वरती बोली लावून 12 संघ तयार करण्यात आले 12 संघात प्रथमतः साखळी सामने खेळविण्यात आले, त्यानंतर क्वालिफाय राऊंड पार पडला. क्वालिफाय राउंड नंतर स्वाभिमानी फायटर्स आणि खूळ स्मॅशर्स तर बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स आणि आनंद ग्रुप यांच्यात सेमीफायनल सामने झाले या दोन सेमी फायनल मध्ये खूळ स्मॅशर्स आणि आनंद ग्रुप या दोन संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला नाणेफेक जिंकून आनंद ग्रुपने प्रथम फलंदाजी करत पाच षटकात 76धावांचे मोठे आव्हान खूळ स्मॅशर्स संघासमोर ठेवले या धावांचा पाठलाग करत खूळ स्मॅशर्स संघाने चांगली सुरुवात केली पण काही वेळातच फलंदाज एकापाठोपाठ आउट झाले आणि अंतिम सामना आनंद ग्रुप मे 22 धावांनी जिंकून जे पी एल सीजन 3 चा विजेता ठरला तर खुळ स्मॅशर्स संघ उपविजेता ठरला. या संपूर्ण मालिकेत आपली दमदार खेळी करत अमर हुपरे सर्वोत्कृष्ट फलंदाजासह मालिकावीर बहुमान पटकाविला. तर अक्षय माणगावे यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून बहुमान पटकाविला अंतिम सामन्यानंतर विजेत्याना प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पारितोषिक वाटप करण्यात आले तर या संपूर्ण क्रिकेट मालिकेसाठी ज्या व्यक्तींनी विशेष सहकार्य केले त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच मालिकेतील बारा संघाचे ओनर यांनादेखील सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण सामन्याचा धावफलक ऑनलाइनवर पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना करून देण्यात आली होती या सामन्यासाठी स्कोरर म्हणून शशी जगोजे आणि मनोज विभुते यांनी काम पाहिले तर संपूर्ण मालिकेत ऋषभ फराकटे आणि श्रीधर जासूद यांनी पंच म्हणून चांगली कामगिरी निभावली त्याचबरोबर लाईव्ह कॉमेंटेटर म्हणून महावीर हुपरे आणि मनोज अथणे यांनी आपली भूमिका बजावली दिगंबर जैन समाज रुई वीर सेवादल रुई यांनी या क्रिकेट मालिकेचे नेटके नियोजन केले होते.

error: Content is protected !!