इचलकरंजी एज्युकेशन संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर


इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी जी. एस. ढवळे यांची , तर सुनील नवाल, एस. व्ही. कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी असे- चेअरमन – दीपक राशिनकर, सहविश्‍वस्त सदस्य – जयवंत आलासे, सचिव – कौशिक मराठे. कार्यकारिणी सदस्य – प्रणव साठे, जी. एस. इंगळे, अजित कुलकर्णी, टी. एम. पाटील.

यावेळी नवनियुक्त चेअरमन व पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक ए. ए. खोत, पर्यवेक्षक एम. एस. खराडे यांनी केला. या वेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जे. ए. कोळी यांनी सूत्रसंचालन केले. ए. एम. कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!