सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करुन अटक करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याची मागणी

मुंबई /प्रतिनिधी

   मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren death case) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (maharashtra budget session 2021) महाविकास आघाडी (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) तुफान राडा झाला आहे. सचिन वाझे (Sachin waze) यांना गृहमंत्री अनिल देशमुख पाठीशी घालत आहे, असा संशय देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी दाबली, असा पलटवार सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.

   मनसुख हिरेन प्रकरणावर भाजप आमदारांनी अधिवेशनात जोरदार राडा घातला. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर निवेदन केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुमच्यासमोर वाझे यांना निलंबित करण्याचं ठरलं होतं पण मग आता कोणावर दबाव आहे ? जर वाझे यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला मग तो आता का जाहीर करत नाही, असं फडणवीस म्हणाले.

   तसंच, एखाद्या व्यक्तीला किती मागे घालावे. सचिन वझे यांचा राजीनामा नाही. वाझे कोणत्या पक्षाचे आहेत ? वाझेला निलंबित करा. कारवाई करणे नाही म्हणजे वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देण्यासारखे आहे. वाझे यांना निलंबित करा, हा खरा चेहरा दिसतोय’, असा आरोप फडणवीस यांनी केला.

   देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये दाखल झालेल्या एफआयआरची आठवण करुन दिली. यामध्ये दोघा जणांनी 40 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दोन जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. जामीन मिळालेल्यांमध्ये धनंजय विठ्ठल गावडे आणि सचिन वाझे यांचा समावेश आहे. हे दोघेही कोणत्या पक्षाचे आहेत, सर्वांना माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय गावडे यांच्या घराजवळ होतं आणि त्यांच्या 40 किमीवर हिरेन यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणात आणखी किती पुरावे हवे आहेत? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

error: Content is protected !!