नवे पारगाव /ता :५- प्रतिनिधी
मध्यंतरी ओढ दिलेल्या पावसाने सलग दोन दिवस दमदार हजेरी लावली आहे . संततधार पावसामुळे हातकणंगले तालुक्याच्या पश्चिम भागातील नवे पारगाव परिसरातील ओढे-नाले पाण्यानी तुडुंब भरून वाहात आहेत.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेतकरी वर्गातुन समाधान पसरले आहे.
वारणा नदी यंदा दुस-यांदा पात्राबाहेर आली आहे.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अंतर्गत बंदीमुळे अगोदरच बंद केलेले व सध्याच्या सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणारे वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पूल व जुना चिकुर्डे बंधारा पुल यंदा प्रथमच पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक आणखीनच पुर्णतः ठप्प झाली आहे.पावसाचा कहर असाच वाढत राहिल्यास हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावातील नागरीकांचा अमृतनगर मार्गे वाहतुक बंद होण्याची शक्यता आहे.
