केंद्रीय लोकसेवामध्ये निमीष पाटील यशस्वी …..

इस्लामपूर /ता :४-जितेंद्र पाटील

       केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात इस्लामपूर येथील निमीष दशरथ पाटील यांनी ३८९ वा क्रमांक मिळविला. केआरपी कन्या महाविद्यालयातील प्रा.दशरथ पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. निमिष यांचे प्राथमिक शिक्षण येथील डॉ.व्ही. एस. नेर्लेकर प्राथमिक विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षण आदर्श बालक मंदिर हायस्कूल येथे झाले.विद्यामंदिर हायस्कूल येथे बारावी चे शिक्षण पूर्ण केले.

       यानंतर मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरींग मधून मेकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी घेतली. २०१६ साली दिल्ली येथील वाजेराम अँण्ड रवि अँकँडमीमध्ये प्रवेश घेतला. अभ्यासातील सातत्य, चिकाटी जिद्द आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे यश प्राप्त झाले.

error: Content is protected !!