नवरात्रौत्सवातील नऊ रंग आणि त्यांचं विशेष महत्त्व

आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला (Shardhiy Navaratri) सुरुवात होत आहे. देवीचा नऊ दिवस चालणारा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचं विशेष महत्त्व आहे. देवीच्या नऊ रुपांच्या अनुषंगाने देवीला प्रिय रंगाचं वस्त्र चढवलं जातं. हे नऊ दिवस वेगवेगळे रंगाचं विशेष महत्त्व आहे. यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवातील नऊ रंग आणि त्यांचं विशेष महत्त्व जाणून घ्या.

  1. नवरात्र प्रतिपदा तिथी (पांढरा) (White)
    शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. सोमवारी पांढरा रंग शुभ मानला जातो. देवी शैलपुत्रीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा म्हणजेच श्वेत रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंग धारण केल्याने आत्मविश्वाव वाढतो.

2. नवरात्र द्वितीया तिथी (लाल) (Red)

नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी मंगळवारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक आहे.

  1. नवरात्र तृतीया तिथी (नारंगी) (Orange)

शारदीय नवरात्रौत्सावाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर हा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. बुधवारी चंद्रघंटा देवीला नारंगी रंगाचं वस्त्र अर्पण केलं जाईल. नारंगी रंग सकारात्मक ऊर्जेचा प्रतिक आहे.

  1. नवरात्र चतुर्थी तिथी (पिवळा) (Yellow)

नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी 29 सप्टेंबरला कुष्मांडा देवीची रूजा केली जाईल. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळा रंग सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचं प्रतिक आहे.

  1. नवरात्र पंचमी तिथी (हिरवा) (Green)

शारदीय नवरात्रौत्सावाच्या पाचवा दिवस 30 सप्टेंबरला आहे. या दिवशी स्कंदमातेची आराधना केली जाईल. देवी स्कंदमातेला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग निसर्गाचं प्रतिक आहे. हिरवा धारण केल्यानं चैतन्यामध्ये वृद्धी होते.

  1. नवरात्र षष्ठी तिथी (राखाडी) (Grey)

नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी 1 ऑक्टोबरला कात्यानी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी देवीला राखाडी रंगाचं वस्त्र चढवलं जाईल. राखाडी रंग बुद्धिमत्तेचं प्रतिक आहे.

  1. नवरात्र सप्तमी तिथी (निळा) (Blue)

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते. 2 ऑक्टोबरला सप्तमीच्या दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. आकाश आणि पाण्याचा निळा रंग हा विश्वासाचं प्रतिक आहे.

  1. नवरात्र अष्टमी तिथी (जांभळा) (Purple/Violet)

नवरात्रौत्सवाच्या आठव्या दिवशी अष्टमी 3 ऑक्टोबरला सोमवारी आहे. यादिवशी महागौरीची आराधना केली जाईल. या दिवशी जांभळा रंग अतिशय शुभ मानला जातो. जांभळा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचं प्रतिक आहे. या दिवशी कन्यापूजेचा मुहूर्त आहे.

  1. नवरात्र नवमी तिथी (गुलाबी) (Pink)

शारदीय नवरात्रौत्सवाच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. 7 ऑक्टोबरला नवमी दिवशी गुलाबी रंग शुभ आहे. गुलाबी रंग प्रेमाचं आणि स्त्री शक्तीचं प्रतिक आहे.

error: Content is protected !!