नितीन गडकरी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जोशपूर्ण वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नितीन गडकरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासह सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. संविधान चौकात हजारो कार्यकर्ते चारही बाजुंनी एकत्र आले आणि त्यांच्या साक्षीने अतिशय उत्साहात रॅलीला प्रारंभ झाला. ‘नागपूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांनी गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. महायुतीमधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते गडकरी यांच्या समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

error: Content is protected !!