नितीश तराळ यांचे कार्य कौतुकस्पद -उपअधिक्षक प्रणिल गिल्डा

रुई /ताः ३ राकेश खाडे

सन २०१९ चा प्रलयंकारी महापूर असो वा २०२० मधील कोरोना महामारी अथवा गावातील कोणतेही प्रश्न असो अशा सर्वच कामात पोलीस पाटील नितीश तराळ सक्रिय असतात. त्यांचे कार्य केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आदर्शवत आहे, म्हणूनच जिल्हा पोलिसप्रमुखांच्या सन्मानास ते पात्र ठरले . असे गौरवोद्गार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक प्रणील गिल्डा यांनी काढले.
रुई (ता. हातकणंगले) येथील पोलीस पाटील तराळ यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण केले असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सौ. कोमल साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक भाऊसाहेब फास्के यांनी केले. यावेळी उपसरपंच सुभाष चौगुले, बजरंग तराळ यांची भाषणे झाली. कार्यक्रमास बीट अंमलदार औदुंबर कोरे, कॉन्स्टेबल दिग्विजय देसाई, चंद्रकांत वसवाडे, जावेद मुजावर, सुरज तराळ , कोतवाल प्रवीण कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!