18 नोव्हेंबर दिनविशेष

१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

१९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

१९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

१९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले

२०१५: भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

२०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

१८९८: भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.

१९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म.

१९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म.

१९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म.

१९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म.

१९३१: हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.

१९४५: श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.

१७७२: मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन.

१८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन.

१९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन.

१९६२: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन.

१९९३: लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

१९९६: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

१९९८: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन.

१९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.

२००६: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन.

२०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन.

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.

error: Content is protected !!