डोक्यात लाकडी ओंडक्याचे घाव घालून वृद्धाचा खून

     कुडित्रे (ता. करवीर) येथील आंबेडकर चौकात डोक्यात लाकडी ओंडक्याचे घाव घालून वृद्धाचा खून करण्यात आला. जंबाजी भगवंत साठे (वय 65) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी रत्नदीप ऊर्फ रतन बाळासो भास्कर (वय 38 ) याला अवघ्या दोन तासांत करवीर पोलिसांनी अटक केली.

इचलकरंजीत स्मशानभूमीतच युवकाचा दगडाने ठेचून निघृण खून

     जंबाजी साठे हे शाहू हरिजन पाणीपुरवठा येथे पाटक्या म्हणून काम करत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास आंबेडकर चौक परिसरात पाण्याचे पाळीपत्रक सांगण्यासाठी ते थांबले होते. त्याचवेळी अचानक रतन भास्कर तिथे आला आणि त्याने लाकडी ओंडक्याने साठे यांच्या डोक्यावर घाव घातले. यात साठे यांचा जागीच मृत्यू झाला. साठे निपचित पडल्याचे लक्षात येताच संशयिताने एकाची दारात लावलेली दुचाकी घेऊन पलायन केले. हा हल्ला ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. मृतदेहापासून लाकडी दांडके अंदाजे 30 ते 35 फुटांवर पडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!