रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीनेआदर्श महिला व आदर्श एकत्र कुटुंब पुरस्काराचे वितरण

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने इनरव्हील डिस्ट्रिक्ट  317 च्या चेअरमन सौ. वैशाली उदयराव लोखंडे  व माजी नगरसेवक तथा स्वामी समर्थ टेस्टाईल ग्रुपचे चेअरमन रवींद्र माने यांच्या हस्ते व रोटरी प्रोबस क्लब संस्थापक अध्यक्ष तथा रोटरी प्रोबस क्लबचे डिस्ट्रीक चेअरमन प्रकाशराव सातपुते यांच्या उपस्थितीत आदर्श गृहिणी व आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.


रोटरी भवन नाकोडा नगर येथे संपन्न कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या सौ. वैशाली उदयराव लोखंडे यांच्या हस्ते सौ. महादेवी लिंगराज कित्तुरे यांना ‘आदर्श गृहिणी’ पुरस्काराने तर रवींद्र माने व सौ. वैशाली उदयराव लोखंडे यांच्या हस्ते सातगोडा बाबगोंडा पाटील, रमेश तात्यासाहेब कबाडे, बाबासाहेब अण्णा पाटील व गजानन विष्णुपंत होगाडे यांना ‘आदर्श एकत्र कुटुंब’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे रवींद्र माने यांनी, कुटुंब व्यवस्थेला प्रेरणा देणारे व महिलांचे सन्मान करणारे पुरस्कार देऊन भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य रोटरी प्रोबसने केले आहे. या पुरस्कारामुळे पुरस्कर्त्यांच्या कुटुंबीयांना निश्‍चितचपणे प्रेरणा मिळेल, अभिमान वाटेल असे सांगितले. सौ. वैशाली उदयराव लोखंडे यांनी, पाश्‍चात्य संस्कृतीकडे न वळता एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकमेकाला आधार देणे, प्रोत्साहन मिळत असते असे सांगत त्यांनी रोटरी प्रोबसच्या कार्याचे कौतुक केले.  
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यामध्ये रोटरी प्रोबस अधिक सेवाभावी वृत्तीने काम करेल असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. कुबेर मगदूम व अरुंधती सातपुते यांनी करून दिली तर सत्कार माजी अध्यक्षा सौ. प्राजक्ता होगाडे, विद्यमान सेक्रेटरी विजय पोवार यांनी केला. स्वागत क्लबचे अध्यक्ष शिवबसू खोत यांनी तर उपाध्यक्ष सुनील कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कर्त्यांची ओळख अनुक्रमे सौ. हेमल सुलतानपूरे, सौ. सुजाता कोईक, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. निर्मला मोरे, सौ. प्रमोदिनी देशमाने यांनी करून दिली व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी इचलकरंजी शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसाहेब आवळे यांचा सत्कार सुनिल कोष्टी यांनी केला. यावेळी विलास पाडळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालक प्रमोदिनी देशमाने यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. कुबेर मगदूम, महावीर कुरुंदवाडे, निर्मला मोरे व एम.के. कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आभाराचे कार्य सेक्रेटरी विजय पवार यांनी पार पाडले. या कार्यक्रमात आप्पासाहेब कुडचे, दिलीपराव भंडारे, गजाननराव सुलतानपुरे, जयप्रकाश शाळगांवकर, धनपाल बिंदगे, रमेश मर्दा, हिमांशू मिरगे, सौ. मनीषा कोष्टी, सुधा ढवळे, रेखा कांबळे, जयश्री चौगुले, वीणा श्रेष्ठी, महादेवी खोत, मोहनराव भिडे, बाळासाहेब रुईकर, डी. एम. बिरादार, डॉ. प्रकाश पाटील, अशोक देगांवकर, शंकर कटके, वैभव डोंगरे, गजानन शिरगुरे, कुमार माणकापुरे, सुर्यकांत बिडकर, मनोहर कुराडे, अरुण केटकाळे, विजय बनसोडे, अजित कोईक, लिंगराज कित्तुरे, पुरस्कार प्राप्त मान्यवर त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते

 

error: Content is protected !!