महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी केले जनतेला संबोधित.. बघा काय मुख्यमंत्री

मुंबई/प्रतिनिधी

     महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधित करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिसरी लाट (Coronavirus third wave) येणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, तिसरी लाट आली तरी अर्थचक्र थांबता कामा नये. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राज्यात आणखी कठोर निर्बंध (strict restrictions) लागू करणार का? यावरही भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 

महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल

राज्यांसाठी वेगळं लसीकरण App तयार करण्याची केंद्राकडे मागणी

लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, 18 ते 44 वयोगटातील प्रत्येक नागरिकाला लस मिळणार

उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

जून-जुलैपर्यंत लसींचा पुरवठा सुरळीत होईल

जस जसा लसींचा साठा उपलब्ध होईल तसे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होईल

मे महिन्यात महाराष्ट्राला 18 लाख डोस मिळणार

6 कोटी नागरिकांना 12 कोटी लसींचे डोस द्यावे लागणार

महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक आहेत

राज्यात आत्तापर्यंत 1 कोटी 58 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

7 कोटी लाभार्थ्यांना मोफत गहू आणि तांदुळ वाटप

घोषणा केल्यापासून 15 लाखांहून अधिक नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ

3 कोटी 94 लाख नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ

पुढील 2 महिने शिवभोजन थाळी मोफत

गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणेने एक क्षणाचीही उसंत घेतली नाही

नाशिक, विरार सारख्या घटना दुर्दैवी

हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्लान्टची निर्मिती करणार

काही दिवसांत 275 ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित होतील

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू आहे

काही दिवसांत जिल्ह्यांत प्लान्ट तयार होतील त्यानंतर ऑक्सिजन तुटवडा कमी होईल

आवश्यकता नसताना रेमडेसिवीरचा वापर करू नये, माझी  सर्वांना नम्र विनंती

रुग्णवाढ अधिक झाली तर मोठी अडचण होऊ शकते

केंद्राकडून दररोज 35 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा

राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिवीरची आवश्यकता.

सध्या राज्यात 5500 कोविड सेंटर्स कार्यरत आहेत

राज्यात आतापर्यंत 609 प्रयोगशाळा

रोजी मंदावेल पण रोटी थांबवू देणार नाही

error: Content is protected !!