मेघोली येथे दिड लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त;भुदरगड पोलिसांची कारवाई , एकास अटक

गारगोटी /प्रतिनिधी
   सध्या कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊन असताना दारू दुकाने बंद आहेत , याचा फायदा घेऊन गोवा बनावटीची दारू आणून विकणाऱ्यावर आता भुदरगड पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून आठवड्यात दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे, आज पहाटे मेघोली (ता. भुदरगड ) येथे कारवाई करून सुमारे दीड लाखाची गोवा बनावटीची दारू व टेम्पो असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली आहे.

         मेघोली ता भुदरगड पोलिसांनी कारवाई करून दिड लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त केली.

      याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याकरिता माहिती काढत असताना मौजे मेघोली (ता. भुदरगड ) येथील तानाजी दत्तू पाटील हा आजरा- नवले – मेघोली या दुर्गम भागातील रस्त्याने गोवा बनावटीची बनावट विदेशी दारू तस्करी करून आणतो , अशी बातमी मिळाल्यावरून आज पहाटे मौजे नवले धनगर वाडा येथील रस्त्यावर सापळा रचला, व रस्त्यावरून जाणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीचा छोटा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता या चार चाकी टेम्पो मध्ये ६० बॉक्स गोवा बनावटीची विदेशी दारू मिळून आली. त्यामुळे आरोपी तानाजी दत्तू पाटील, (वय ४१ वर्ष, रा. मौजे मेघोली, ता. भुदरगड ) हा त्याच्या टेम्पोचा वापर करून गोवा राज्यातील विदेशी दारू कर चुकवून, बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र राज्यात आणून, विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून, वाहतूक करताना मिळुन आल्याने ६० बॉक्स विदेशी दारू किंमत १,४७, ६००/- रूपये तसेच चारचाकी टेम्पो असा एकूण ३,९७,६०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
    उपनिरीक्षक सतीश मयेकर पोलीस नाईक संदेश कांबळे, पोलीस शिपाई भांदीगरे, किरण पाटील, पोलीस शिपाई चालक मेटकर यांनी भाग घेतला.

error: Content is protected !!