रेंदाळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

 रेंदाळ ता. हातकणंगले येथील एकाने शेतातील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. दशरथ लक्ष्मण भोसले (वय ५६, रा. मूळ गाव सोनार गल्ली, कौलगे, ता. कागल) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
  पोलिसांनी सांगितले अधिक माहिती अशी की दशरथ भोसले हे किशोर कोरे यांच्या शेतात दहा-पंधरा वर्षांपासून सालगडी म्हणून कामास होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपले काम संपल्याचे सांगत कोरे यांच्याबरोबर हिशेब करून गावाकडे परत जातो म्हणून बाहेर पडले होते. पण ते गावाकडे न जाता ते रेंदाळ येथेच थांबले. दरम्यान, मंगळवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास कोरे यांच्या शेतातील करंजीच्या झाडास गळफास घेतल्याचे सकाळी निदर्शनास आले.
error: Content is protected !!