पाडळीच्या जलस्वराज योजनेत एक कोटीचा घोटाळा – आम. राजूबाबा आवळे

हातकणंगले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील पाडळी गावातील जलजीवन मिशन योजनेसाठी एक कोटीची उचल झाली आहे. पण गावाला पाणी मिळत नसल्याचा गौप्यस्फोट आम. राजूबाबा आवळे यांनी हिवाळी अधिवेशनात केला.
विधानभवनात बोलताना आम. राजूबाबा आवळे म्हणाले , माझ्या हातकणंगले मतदारसंघामध्ये पाडळी म्हणुन ग्रामपंचायत आहे. ५००० लोकसंख्या असणारे गाव आहे. आणि २००६ -०७ ला जलस्वराज्य योजना मंजूर झाली होती. आणि योजना फक्त कागदावरच आहे. गावाला पाणी तर मिळालंच नाही. राहुल वसंत पाटील यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली. पण कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये ही योजना वर्ग झालेली नाही.

त्यानंतर २०२१ -२२ ला जलजीवन मिशन मंजूर झालं. ते पण कागदावरच आहे. फक्त खोटं नाटकं कागदपत्रे गोळा करून ही जी योजना मंजूर केलेली आहे. पण गावाला पाणी मिळालं नाही. जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
पण पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला पाणी मिळंणा झालंय. एक कोटी रुपये उचल झालेली आहे. एक कोटी रुपयं गेले कुठं . कुठलाही डिपार्टमेंट सांगत नाही. यामध्ये जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
आम. आवळे यांनी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटामुळे तालुक्यात चर्चेला उत आला असुन संबधित अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत.

error: Content is protected !!